Skip to main content

वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर : काळजी आणि नवोपक्रमाची परंपरा असलेल्या आघाडीच्या आरोग्य सेवा प्रदाता वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर ने अवयवदानाच्या उदात्त कृतीबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी उडान 2023 या विशेष जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले आहे.

उडान – 2023 हा वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरचा एक खास कार्यक्रम आहे, जो जागतिक अवयवदान दिनानिमित्त अवयव दान जनजागृतीसाठी आणि अवयवदाते आणि प्राप्तकर्त्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर तर्फे गेल्या काही वर्षांतील या प्रमुख कार्यक्रमाची ही दुसरी आवृत्ती आहे.

उडान 2023 ही थीम गिफ्ट ऑफ लाईफवर आधारित आहे. गिफ्ट ऑफ लाईफ ही थीम म्हणजे एक उदात्त कृती जी अनेकांचा जीव वाचवते आणि नवीन जीवन देते. ब्रेन डेड झालेल्या व्यक्तीकडून अवयवदान म्हणजे एक प्रकारे अवयवदान मिळालेल्या व्यक्तीसाठी गिफ्ट ऑफ लाईफच आहे.

या खास कार्यक्रमात, प्रख्यात डॉक्टर – प्रोफेसर डॉ. टॉम चेरियन, लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन , डॉ. संजय कोलते (व्हीपी – झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर ), डॉ. सूर्यश्री पांडे, नेफ्रोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन आणि डॉ. देवयानी ठाकरे वक्ते म्हणून असतील. वोक्हार्ट हॉस्पिटलने आजपर्यंत अनेक अवयव प्रत्यारोपण केले आहेत आणि अवयवदाते आणि प्राप्तकर्ते/त्यांचे नातेवाईक या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांचे अनुभव शेअर करतील. वोक्हार्ट हॉस्पिटल्सने संपूर्ण नागपूर शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि चित्रकला, नृत्य, स्किट, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, फ्लॅशमॉब इत्यादी नाविन्यपूर्ण माध्यमांद्वारे त्यांच्या जनजागृतीच्या कल्पना सादर करण्यासाठी सामील केले आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्सचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना अवयवदानाबद्दल प्रबोधन करण्याचा, अवयवदानाचे महत्त्व समजून घेण्याचा आणि या उदात्त कार्यात योगदान देण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

प्रोफेसर डॉ. टॉम चेरियन हे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एलएडी कॉलेजमध्ये अवयव दानाबद्दल जनजागृती सत्र संबोधित करणार आहेत.

प्रख्यात लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन प्रो. डॉ. टॉम चेरियन म्हणाले, “अवयव दानाबद्दल अधिक जागरूकता निर्माण केली पाहिजे जेणेकरून अनेक जीव वाचवता येतील आणि अशा प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादी व्यवस्थापित करता येईल. अवयवदान, एक असे कार्य ज्याने अनेक कुटुंबांना आनंद दिला आहे जो शब्दात सांगता येणार नाही.”

डॉ. संजय कोलते (व्हीपी – झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन सेंटर ), आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन म्हणाले, “तुमच्या आरोग्याचे खरे मूल्य समजून घ्या, तुम्ही निघून गेल्यावर तुमच्या शरीररूपी संपत्तीचे अंत्यसंस्कार करू नका. जिवंतपणी आपले अवयव दान करण्याची प्रतिज्ञा घ्या आणि गरजूंना मदत करा, त्यांची भरभराट करा. अवयवदान करून कोणाच्यातरी मृत्यूमध्ये तुमचा श्वास टाका .”

डॉ. सूर्यश्री पांडे, नेफ्रोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन म्हणाल्या, “त्या नेहमीच अवयवदान करण्याच्या खंबीर समर्थक आहेत आणि जेव्हा एखाद्याचा जीव वाचतो, तेव्हा ते पाहणे आणि अनुभवणे हा एक उत्तम क्षण असतो.

डॉ. देवयानी ठाकरे म्हणाल्या, “मी व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट आहे आणि पेंटिंग करायला आवडते. अवयवदानाचा संदेश देण्यासाठी आम्ही या कलेची निवड केली ती मुख्य गोष्ट म्हणजे कला लोकांशी अधिक सहजतेने जोडल्या जाते आणि अधिकाधिक लोक त्यात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे लोकांमध्ये कोणत्याही प्रकारची जागृती निर्माण करण्यासाठी कला हे परिपूर्ण माध्यम आहे आणि एक कलाकार म्हणून या प्रसंगी उपस्थित राहण्यात मला आनंद आहे आणि मी याबद्दल बोलणार आहे .”

वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूरच्या वतीने अवयवदान करणाऱ्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त केली. सगळ्या अवयव प्राप्तकर्त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले, आणि मोठ्या संख्येने लोकांनी आनंदी मनाने अवयवदानाची शपथ घेतली.

श्री अभिनंदन दस्तेनवार सेंटर हेड वोक्हार्ट हॉस्पिटल्स नागपूर म्हणाले, “आम्हाला हा कार्यक्रम आयोजित करताना खूप आनंद होत आहे कारण अवयवदान हे एक दैवी कार्य आहे जे जीव वाचवते. आम्हाला अभिमान आहे की वोक्हार्ट हॉस्पिटल्स अशा प्रशंसनीय उपक्रमासाठी नेहमीच अग्रेसर असते . आम्ही आमच्या डॉक्टरांच्या टीमचे आणि या कार्यक्रमाचा भाग असलेल्या सर्वांचे आभारी आहोत.

Source: https://www.ngplivenews.com/2023/08/blog-post_13.html

Share with Your Family & Friends

Leave a Reply